बचत की गुंतवणूक – तुम्ही काय निवडायला हवं ? – Jar

December 29, 2022

बचत किंवा गुंतवणूक यापैकी सर्वोत्तम पर्याय कोणता? गुंतवणूक म्हटलं की त्याच्याशी संबंधित जोखमीची भीती वाटते आणि बचत ही कधीच पुरेशी वाटत नाही. मग अशा वेळी नक्की काय बरं करावं? चला बघूया.

अगदी लहानपणापासून आपले पालक आणि वडीलधारी मंडळी ‘पैसे वाचवा’ हे तत्व आपल्या अंगी बाणवण्याचा आटोकाट प्रयत्न करतात.

‍कारण पैशांची बचत केल्यामुळे आपल्या उत्पन्नातील हा ऐवज आर्थिक अडीअडचणीच्या वेळी किंवा भविष्यकालीन गरजांसाठी उपयोगी ठरतो.

परंतु, सध्याची पैशाच्या व्यवस्थापनाची तत्त्वे लक्षात घेता, केवळ पैशाची बचत करणे पुरेसे होऊ शकत नाही. वाचून पाहा, श्रीमंत माणसांकडून 8 आर्थिक सल्ले.

‍प्रामुख्याने, जर तुम्हाला 10/20 वर्षात उत्पन्नाची 7 ते 8 आकडी संख्या गाठायची असेल तर उत्पन्नाची योग्यप्रकारे केलेली गुंतवणूक चमत्कार दाखवू शकते आणि तुमची संपत्ती वाढू शकते.

‍सध्याचा कल असा दिसून येत आहे की, महामारीच्या नंतर जवळपास 70% भारतीय पैशांची बचत किंवा गुंतवणूक करीत आहेत.

त्यामुळे, जर तुम्ही तुमच्यासाठी कमवू लागला असाल तर तुम्हाला बचत करावी की गुंतवणूक करावी हा प्रश्न सतत सतावत असणार!

खुशखबर! या लेखात आम्ही बचत आणि गुंतवणूकीचे विविध आयाम उलगडून दाखवले आहेत, तसेच या दोन्हीची वैशिष्ट्ये कोणती आहेत व या दोन्ही गोष्टींचे आपल्या जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व सांगितले आहे.

या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी, काही गोष्टी समजून घेऊ:

बचत आणि गुंतवणूक यात नक्की काय फरक आहे ?

प्रथमदर्शनी असे वाटते की बचत आणि गुंतवणूक या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. परंतु, या दोन्हीमध्ये काही मुलभूत फरक आहेत ज्यामुळे या दोन्ही माध्यमातील विविध पैलू स्पष्ट होऊ शकतो.

कालावधी: बचत सामान्यत: लहान आर्थिक उद्दीष्टे साध्य करण्यासाठी केली जाते जसे, कार खरेदी करणे, नवा फोन खरेदी करणे, घराचे डीपॉझिट/ठेव भरणे किंवा एखादा अनपेक्षित खर्च करणे. साधारणपणे ही बचत अल्पमुदतीसाठी जसे 2-3 वर्षासाठी केली जाते.

गुंतवणूक ही मोठ्या कालावधीसाठी आणि मोठी आर्थिक उद्दीष्टे गाठण्यासाठी वापरली जाते जसे, एखादे स्वप्नातले घर खरेदी करण्यासाठी पैशांची जोडगण करणे, मुलांच्या शिक्षणासाठी पैशांची तरतूद करणे किंवा सेवानिवृतीनंतर आरामदायी आयुष्य घालविण्यासाठी पुरेशी संपत्ती मिळविणे. त्यामुळे, जर तुम्हाला 10 वर्षात तुमच्या आयुष्यातील ध्येय गाठण्यासाठी अतिरिक्त पैसा उभा करायचा असेल तर तुमच्या पैशांची गुंतवणूक तुम्हाला मदतीची ठरू शकते.

व्याज: आणखी एक फरक म्हणजे तुम्ही बचत किंवा गुंतवणूक केल्यावर मिळणारा पैसा. जर तुम्ही पैशांची गुंतवणूक केली तर तुम्हाला काही कालावधीत त्या रकमेसाठी चांगले रिटर्न/परतावा यावा अशी अपेक्षा असते. त्याउलट जेव्हा तुम्ही बचत करता तेव्हा कमी व्याज घेऊनही तुम्हाला त्या पैशांची सुरक्षितता अधिक महत्त्वाची वाटते.

जोखीम: पैशांची गुंतवणूक केली असता तुम्हाला मिळणारा रिटर्न/परतावा बाजारातील चढउतारांशी संबंधित असतो त्यामुळे त्याबाबत जोखीम अधिक असते. बचत केली असता, ती तुम्ही वैयक्तिकरित्या घरगुती स्वरुपात करता किंवा पैशांची सुरक्षितता लक्षात घेऊन धोका कमी असलेल्या बचत खात्यात पैसे जमा करता.

आता, वरील माहिती लक्षात घेता, तुम्ही दरवर्षी अधिक रिटर्न/परतावा मिळविणारे यशस्वी गुंतवणूकदार नक्की होऊ शकता परंतु जर तुमच्याकडे अनपेक्षित खर्चासाठी योग्य बचत केलेली नसेल तर त्यासाठी अचानक संघर्ष करावा लागू शकतो.

हे विधान आम्हाला आमच्या पुढील मुद्द्यापाशी आणते:

बचत करणे गरजेचे असते

कुठल्या कारणासाठी वापर केला जावा याचा विचारही न करता बचत करणे आवश्यक असते. कारण नोकरी गमावणे, वैद्यकीय अडचण येणे अशा अनपेक्षित आपत्ती कधीही येऊ शकतात.

जर तुम्ही अशा परिस्थितीत अडकलात, तर तुमच्याकडे पैशांची तरतूद असणे गरजेचे असते. त्यामुळे आकस्मिक निधी म्हणून 3 ते 6 महिन्यांची पुंजी साठवणे ही चांगली कल्पना आहे.

उत्पन्नातून खर्च वजा जाता उरलेल्या रक्कमेची तुम्ही बचत करु शकता. या बचतीच्या रकमेचा काही भाग बँकेत मुदत ठेवीत अल्प कालावधीसाठी गुंतवला जाऊ शकतो.

बचत एखाद्या पिगी बँक सारखी असते ज्यात आपला पैसा सुरक्षित असतो, परंतु तुमच्या पैशाची योग्य गुंतवणूक करणे व त्या पैशाचा वापर करून तो वाढवणे हा तुमच्या दीर्घकालीन उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्याचा उत्कृष्ट मार्ग असतो.

 

त्यामुळेच: 

गुंतवणूक महत्त्वाची असते

तुमची दीर्घकालीन उद्दीष्टे साध्य करण्यासाठी आणि आर्थिक भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी गुंतवणूक करणे गरजेचे असते.

अनेक आर्थिक तज्ञ तुमच्या उत्पन्नाच्या 10 ते 15 टक्के भाग गुंतवण्याचा सल्ला देतात. फायद्याचा विचार करता, एक गुंतवणूकदार म्हणून तुम्ही खालील गोष्टी मिळवता:

महागाईशी सामना: कालांतराने, चलनवाढ झाल्यामुळे तुमच्या पैशाची क्रयशक्ती कमी होते व पैशाचे अवमूल्यन होते.

यापासून सावध राहण्यासाठी, तुम्ही चलनवाढीच्या दरापेक्षा जास्त क्षमता असलेल्या गुंतवणुकीमध्ये तुमचा पैसा गुंतवावा ही चांगली कल्पना आहे.

तुम्ही तुमची आर्थिक उद्दीष्टे साध्य करत आहात याची खात्री करा: अगदी तुमच्या लग्नासाठी किंवा तुमच्या मुलाच्या कॉलेजच्या शिक्षणासाठीची बचत असो वा तुमच्या भविष्याची तयारी असो कोणतीही आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी गुंतवणूक तुम्हाला मदत करू शकते.

बचत खाते किंवा फिक्स डिपॉझिट/निश्चित ठेवीच्या तुलनेत, म्युच्युअल फंड आणि इक्विटीसारखे गुंतवणूकीचे पर्याय मोठ्या प्रमाणात रिटर्न/परतावा देतात.

खाली दिलेला तक्ता या दोन्ही पर्यायांच्या विविध पैलूंची तुलना दर्शवतो:

तर मग बचत करावी का गुंतवणूक ? – कोणता पर्याय चांगला?

दोन्हीमध्ये भरपूर फायदे आहेत तसेच दोघांमध्ये संतुलन राखणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

बाजारात केलेल्या गुंतवणूकीचा परिणाम पाहण्यासाठी संयम बाळगणे आवश्यक असते आणि तुमच्या खात्यांमध्ये जरी दीर्घकालीन बचत केली तरी त्यासाठी तुम्हाला मिळणारा फायदा तुटपुंजा असतो.

जर तुमचा हेतू दीर्घकालीन आर्थिक नियोजन करण्याचा असेल (शक्यतो अनेक वर्षे) आणि नजीकच्या काळात पैशांची गरज उद्भवणार नसेल तर गुंतवणूक करणे ही चांगली कल्पना आहे.

पण, आपत्कालीन ठेव म्हणून वापरण्यासाठी अल्पावधीत रोख रक्कम हवी असल्यास बचत खाते हा एक उत्तम पर्याय आहे.

शेवट करण्यापूर्वी,

आपल्या दैनंदिन जीवनातील त्यांचे महत्त्व लक्षात घेता बचत आणि गुंतवणुकीत बरेच साम्य आहे. जर तुम्ही यापैकी काहीच करत नसाल तर ताबडतोब सुरुवात करा.

तुमच्या पैशांचे व्यवस्थापन करण्याचा कोणताही योग्य किंवा अयोग्य मार्ग नाही, कारण हे सर्व केवळ आत्ता तुम्ही कोणत्या टप्प्यावर आहात यावर अवलंबून आहे.

जर तुम्हाला या दोन पर्यायांचे संतुलन कसे साधायचे याबद्दल शंका असेल तर अल्पकालीन बचत आणि दीर्घकालीन गुंतवणूक वेगळी ठेवण्यासाठी काही सामान्य नियमांचे पालन करा.

जेव्हा दीर्घकालीन पैशांचा प्रश्न येतो, तेव्हा अल्प-मुदतीच्या फायद्यावर पैसे मिळवण्यापेक्षा गुंतवणूक हा एक चांगला पर्याय आहे.

जर तुमची जोखीम सहन करण्याची क्षमता असेल तर त्यानुसार तुम्ही शेअर बाजारात म्युच्युअल फंडच्या काही पर्यायांमध्ये गुंतवणूक करून वैविध्यपूर्ण गुंतवणूक पोर्टफोलिओ तयार करू शकता.

गुंतवणुकीची प्रक्रिया क्लिष्ट असू शकते, पण सुरुवात करण्यासाठी अनेक सोप्या पायऱ्या आहेत. गुंतवणुकीबद्दल अधिक जाणून घ्या तसेच तो तुमच्या आर्थिक भविष्यासाठी योग्य पर्याय का असू शकतो याची माहिती घ्या.

तुमच्या उत्पन्नाचा आणि एकूण खर्चाचा आढावा घेतल्यास लगेचच तुमच्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम असू शकतो हे तुमच्या लक्षात येईल.

बचत आणि गुंतवणूकीसाठी शुभेच्छा!

     

Subscribe to our newsletter
Thank you! Your submission has been received!
Oops! Something went wrong while submitting the form.