फ्रीलान्सर्सना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र करण्यासाठी ८ फायनान्शिअल टिप्स

December 28, 2022

बरेच लोक पूर्ण वेळ फ्रीलान्सिंगकडे वळत असताना आणि FIRE जीवनशैली जगत असताना, आर्थिकदृष्टया स्वतंत्र राहण्यासाठी पुढील लेख वाचा.

प्रत्येक महिन्याला तुमच्या पगारातून १० ते १५% रिटायरमेंट साठी बाजूला ठेवणे, स्वतः साठी खर्च करणे, टॅक्स प्लॅनिंग करणे असे बरेच आर्थिक सल्ले तुम्हाला मिळाले असतील.

मात्र, फ्रीलान्सिंग करत असताना उत्पन्नात येणारे चढ उतार पाहता या टीप्स निरुपयोगी आणि असंबंधित ठरतात, बरोबर? यापैकी काही लागू पडत नाही.

जसे, तुमचे उत्पन्न अनियमित असल्यास त्यामधील १०% रिटायरमेंटसाठी बाजूला काढणे फार कठीण असते.

तुमचे कर्ज फेडण्यासाठी तुम्ही जास्त रक्कम देखील देऊ शकत नाही कारण उशिराने होणाऱ्या पेमेंटमुळे नंतर मनस्ताप सहन करावा लागू शकतो.

आपल्या सर्वांनाच आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हायचे असते. ९ ते ५ जॉब करणे हे आधीच कठीण काम असते परंतु आपण फ्रीलान्सर असल्यास ते अधिक अवघड वाटू शकते.

त्यामुळेच येणाऱ्या उत्पन्नामध्ये अनिश्चितता असेल तर आर्थिक बाबींचा विचार करणे महत्वाचे बनते.

फ्रीलान्सर म्हणून काम करत असताना तुम्हाला तुमच्या मिळवलेल्या पैशावर नियंत्रण ठेवता येते तसेच तुम्ही ते कोठे खर्च होतात ते तुम्ही पाहू शकता जे तुम्हाला कॉर्पोरेशन मध्ये काम करत असताना समजत नाही.

रिसर्चगेटनुसार, पूर्ण जगभरातील फ्रीलान्सर्सपैकी ३३% (प्रत्येकी तिसरा फ्रीलान्सर) म्हणजेच १५ दशलक्ष फ्रीलान्सर्स हे भारतातील आहेत.

खरंतर, तज्ञांना असा विश्वास आहे की २०३५ पर्यंत दर पाच वर्षांनी ही संख्या दुप्पट होईल.

आता, बरेच जण पूर्ण वेळ फ्रिलान्सिंगकडे वळत असताना आणि FIRE (आर्थिक स्वातंत्र्य/लवकर निवृत्ती) अशा जीवनशैलीकडे वळत असताना तुम्ही आर्थिक नियोजन कसे करता, आर्थिक उद्दिष्टे कशी पूर्ण करता आणि आर्थिकदृष्टया कसे स्वतंत्र होऊ शकता?

जारने तुम्हाला उपयोगी पडतील अशा सगळया आर्थिक टीप्स  दिल्या आहेत:

१.तुमचे दर योग्यरित्या ठरवणे

बऱ्याचदा, फ्रिलान्सर स्वतःला कमी मूल्य देतात आणि सुरुवातीला ते कमी शुल्क आकारतात. कारण ते कर्मचाऱ्याच्या मानसिकतेत अडकलेले असतात आणि पूर्वीच्या एम्प्लॉयरकडून मिळणारे सगळे फायदे घेण्यास अयशस्वी ठरलेले असतात.

तुम्ही स्वतःचा बॉस असता त्यामुळे तुम्हाला मिळणाऱ्या भत्त्यांसाठी जास्त शुल्क आकारले पाहिजे.

तुमचा किमान खर्च मोजा. बचत, आरोग्य विमा, आपत्कालीन आणि रिटायरमेंट फंड, टॅक्स तसेच पुढील काही खर्च या सगळ्याचा विचार करा. क्लायंट मिळणार नाही त्या वेळेसच्या खर्चाच्या परिस्थितीचाही शुल्क ठरवण्याआधी विचार करा.

तुम्हाला काम करणे कधीच थांबवायचे नसेल, पण तुम्ही तयार असेल पाहिजे अशा दिवसांसठी जेव्हा तुम्ही काहीच कमवत नसाल किंवा तुम्हाला ३५ व्या वर्षी रिटायर होण्याची इच्छा असेल.

एका महिन्यात तुम्ही कमीत कमी किती कमवले पाहिजे हे देखील तुम्हाला इथे शिकायला मिळेल.

२.अनावश्यक खर्च कमी करणे

कष्टाने कमावलेले पैसे कदाचित तुम्ही अनावश्यक गोष्टींवर खर्च करत असाल. तुमचे वैयक्तिक तसेच कॉर्पोरेट खर्च तपासण्याचा आणि अनावश्यक खर्च कमी करण्याचा चांगला निर्णय घ्या. 

ऑटोमेटेड इन्व्हेस्टमेंट किंवा एखाद्या दुसऱ्या बँकेच्या विशेष बचत खात्यात हे पैसे का ठेऊ नयेत? जार ॲपला लाईक करा 

तसेच, अशा कुठल्याही गोष्टींसाठी पैसे उधार घेऊ नका ज्याची किंमत त्याच्या मुल्यापेक्षा जास्त असेल. बचत करण्याची सवय लावा.

जास्त पैसे कमविण्यावर आणि स्वयं-पूर्णतेसाठी तुमच्या आर्थिक उद्दिष्टांसाठी करण्यासाठी नवीन रेव्हेन्यू निर्माण करण्यावर लक्ष द्या.

३.बजेट प्लॅन करा

तुम्ही ९ ते ५ काम करणारे कर्मचारी असाल किंवा फ्रीलान्सर असाल, बजेटिंग करणे प्रत्येकासाठीच आवश्यक आहे. वारंवार येणाऱ्या खर्चाची यादी बनवून प्राधान्य देऊन क्रम ठरवा.

 एकदा तुम्हाला तुमचा महिन्याचा खर्च समजल्यावर बजेट सेट करा. तुमच्या खर्चाकडे आणि बचतकडे लक्ष द्या.

इकडे शून्यामधून सुरू करणे ही ट्रिक आहे. तुम्ही मागील काही महिन्यांमध्ये केलेल्या फक्त सरासरी खर्च पाहू नका.

त्यानंतर, भाडे, अन्न, पाणी आणि वीज अश्या बेसिक गोष्टींना प्राधान्य द्या.

जसजसे पूर्ण महिन्याभरासाठी तुम्हाला पैसे मिलेत जातील, तसे तुम्ही तुमच्या यादीतील महत्वाच्या गोष्टींवर पैसे खर्च कराल आणि तुम्हाला हवे तसे काम कराल.

इकडे महत्वाचा मुद्दा असा की, महत्वाच्या गोष्टींवर पैसे खर्च करून उरलेले गुंतवणे.

४.आपत्कालीन निधीसाठी वेगळे अकाऊंट तयार करणे

तुम्ही फ्रीलान्सर म्हणून काम करत असताना कदाचित उत्पन्नामध्ये चढ-उतार होतील परंतू त्याचा अर्थ असा नाही की तुमचे खर्च अनिश्चित असतील.

त्यामुळेच, आप्तकालीन निधी उभारण्यासाठी अधिक वेळ जाऊन चालणार नाही. तुमच्या आपत्कालीन फंड मध्ये निदान सहा महिने पुरतील इतके पैसे असणे गरजेचे आहे.

अपघात, उशिरा झालेले पेमेंट किंवा कार ब्रेकडाऊन अशा तातडीच्या कुठल्याही गरजेसाठी तुम्हाला कधी गरज लागेल हे सांगता येत नाही. अनपेक्षित क्षणांसाठी नेहमी तयार रहा.

स्वतंत्र किंवा स्वयं रोजगार असलेल्या आयुष्यासाठी, तुम्ही पूर्ण वेळ असलेली नोकरी सोडण्याआधी तुमच्या हातात निधी हा असलाच पाहिजे.

तुमच्या गरजा आणि टॅक्स पूर्ण झाल्यानंतर उरलेले फंड विशेष आपत्कालीन निधीसाठी बनविलेल्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करा.

ज्या महिन्यात काम नसेल तेव्हा देखील सगळे खर्च नीट पार पडेल. तुम्ही तुमच्या वास्तविक उत्पन्न आणि कमीतकमी गरजा यामधील फरक अकाऊंटमध्ये ट्रान्स्फर करू शकता.

जास्त उत्पन्न मिळणाऱ्या महिन्यांत पैसे साठवा. यामुळे तुम्हाला मन:शांती मिळेल तसेच तुम्हाला पूर्णपणे कॅश इन्व्हॉईसवर अवलंबून राहावे लागणार नाही.

५.तुमच्या बचतीचा मासिक बिलाप्रमाणे विचार करा

तुमच्या बचतीचा मासिक बिलाप्रमाणे विचार करण्यास सुरू करा. तुम्ही तुमच्या बेसिक गरजा पूर्ण करण्यासाठी होणारा खर्च स्थिर केल्यावर तुम्ही स्वतःसाठी खर्च करू शकता.

याला तुम्ही नियमित होणाऱ्या खर्चातच मोजा. म्हणजे तुम्हाला ते एक ओझे न वाटता जीवनाचा एक भागच असल्यासारखे वाटेल.

या मार्गाने, थोडी थोडी बचत करून तुम्हाला नंतर अंकामध्ये त्याचा फायदा दिसून येईल. हे खूप रोमांचित करणारे आहे.

६.आर्थिक उद्दिष्टे नियमित तपासणे आणि सुधारणा करणे

रिटायरमेंटसाठी बचत करण्या व्यतिरिक्त आपल्या सर्वांची वेगवेगळी आर्थिक उदिष्ट्ये आसतात. एकदा आपलं आपत्कालीन आणि रिटायरमेंट फंड सेव्ह झाल्यानंतर आपण दुसरे खर्च पाहू शकतो जसे की नवीन घर किंवा कार घेणे, ट्रीप, शिक्षण, मेडिकल इमर्जन्सी आणि इतर.

अल्प ते मध्यम मुदतीचे आर्थिक उद्दिष्टे तुमच्या सेवानिवृत्तीच्या सेविंग्ज सोबत किंवा त्या बरोबरच पूर्ण केली पाहिजेत.

आपली उदिष्ट्ये सतत तपासून पाहत रहा आणि त्यांध्ये सुधारणा करत रहा. परंतु लहान किंवा मोठी, तुमची नेहमीच काहीतरी ध्येय असायला हवीत.

आपलं पूर्ण लक्ष त्यावर केंद्रित करा आणि त्यानुसार आपल्या जीवनशैलीत बदल करा. अशाप्रकारे तुम्ही लवकरात लवकर आर्थिकदृष्टया स्वतंत्र व्हाल.

७.इन्शुरन्स काढा

आता तुम्ही कोणत्याही कंपनीमध्ये पूर्णवेळ काम करत नसल्यामुळे तुम्हाला तुमची काळजी घेणं जरुरी आहे. तुमचा चांगला आरोग्य विमा आणि टर्म इन्शुरन्स असणे आवश्यक आहे.

या दोन्हींसाठी पॉलिसीसाठी प्रीमियम जास्त नाही आहे आणि जार तुम्ही वयाने लहान असाल तर तुम्हाला तुमच्या गरजेप्रमाणे ह्यामध्ये बदल करता येऊ शकतात.

देशातील सध्याची आरोग्य स्थिती पाहता ही एक अशी गोष्ट आहे ज्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही.

रिसर्च करून तुम्ही तुमच्या वैयक्तिक गरजा पूर्ण करता येणारी पॉलिसी घ्या. आता अशा काही इन्शुरन्स कंपनी आहेत ज्या फक्त मृत्यू नाही तर अपंगत्व तसेच काही आजार देखील कव्हर करतात. त्यामुळेच इन्शुरन्स घेण्याआधी रिसर्च करा.

८.सोन्यामध्ये गुंतवणूक करा

फ्रीलान्सिंग खूप फायदेशीरअसू शकते पण कालांतराने तुमचे पैसे कमी होऊ शकतात. महागाईमुळे हा परिणाम होतो.

त्यामुळेच तुम्ही तुमचे उत्पन्न स्थिर करून यामधून मार्ग काढला पाहिजे.कसा ? सोन्यात गुंतवणूक करून. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये बदल घडवण्यासाठी आणि महागाईचा सामना करण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.

चांदी आणि प्लॅटिनममध्ये देखील गुंतवणूक करण्याचे पर्याय आहेत.मात्र सोने जुन्या अनुभवामुळे आणि सहज होणाऱ्या उपलब्धतेमुळे तसेच सहज खरेदी करता येत असल्यामुळे एक विश्वासार्ह  पर्याय आहे. तुम्हाला ते भौतिक स्वरूपात घेण्याची गरज नसून तुम्ही ते डिजिटली आणि SGBs स्वरूपात देखील खरेदी करू शकता.

इतर ठराविक गुंतवणूक ऑप्शन्सच्या तुलनेत अस्थिर अशा बाजारपेठेत हा मौल्यवान धातू स्थिर राहिला आहे.

असे असले तरी, स्टॉक आणि बॉण्ड्स मध्ये गुंतवणूक करण्याआधी तुमची रिस्क घेण्याची क्षमता असणे अत्यावश्यक आहे. त्यानंतर सोन्यात गुंतवणुक करा आणि पैसे सहज वाढवा. जार ॲपद्वारे गुंतवणूक करा.

 फ्रीलान्सिंग किंवा पूर्ण वेळ काम करणे, आर्थिक नियोजन करताना दोन्हींमध्ये स्ट्रगल आहे.

मात्र अशक्य असे काहीच नाही. या टिप्समुळे तुम्हाला जीवन जगताना आर्थिक अडचणींमुळे कुठे थांबावे लागणार नाही. तसेच तुम्ही तुमचे आर्थिक स्वातंत्र्य बिनधास्त उपभोगू शकाल.

Subscribe to our newsletter
Thank you! Your submission has been received!
Oops! Something went wrong while submitting the form.